उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिजाई या निवासस्थाना पासून पिंपरी चिंचवडच्या दिशेने जात असताना रेंज हिल परिसरात एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. दादांनी ताफा थांबवत अपघातग्रस्तांची विचारपूस केली व आपल्या ताफ्यातील ॲम्बुलन्समध्ये उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.