अजित पवार यांनी मुंबईतील मतदार यादीत 11-12 लाख दुबार नावे असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणली आहे. काही ठिकाणी एकाच व्यक्तीची अनेकदा नोंद असून, स्थलांतरित नागरिकांची नावेही यादीतून काढली जात नसल्याचे ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.