पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातर्फे, शरद पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर शरद पवार यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो देखील झळकत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर युवक उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी हे बॅनर लावले आहेत.