महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर अजित पवार कायमस्वरूपी दिसणार का, या पत्रकाराच्या प्रश्नाला त्यांनी सूचक उत्तर दिले आहे. तुझ्या तोंडात साखर पडो असे म्हणत अजित पवारांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.