महायुतीमध्ये अंतर्गत पक्षप्रवेश करायचा नाही, असे ठरलेले असतानाही पिंपरीमध्ये फोडाफोडी झाल्याबद्दल अजित पवारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मित्रपक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी घेऊ नयेत, असे सामंजस्य होते, मात्र ते पाळले गेले नाही, असे त्यांनी म्हटले. मुंबईत यावर चर्चा करणार असल्याचेही पवार म्हणाले.