बीडमधील सहकारभवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्री अजित पवारांना दिलेली दक्षिणा पवारांनी नाकारली. ५०० रुपयांची नोट अनेकांकडून फिरून सोनवणेंकडेच परत आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. अजित पवारांच्या नकारामागे नेमके काय कारण असावे याची उत्सुकता आहे.