रायगड जिल्ह्यातील तळा नगरपंचायतच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. चंडिकादेवी मंदिर पटांगण येथे हा सोहळा पार पडला. खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या इमारतीमुळे नगरपंचायत प्रशासन अधिक सक्षम होऊन परिसराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.