उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थी आज पंढरपूर नगरीत दाखल झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना तसेच अजित दादा प्रेमींना दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अस्थी कलश आणण्यात आला होता. यानंतर सजवलेल्या रथातून अस्थी कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धार्मिक विधी पार पाडल्यानंतर मोठ्या श्रद्धेने आणि शिस्तबद्ध वातावरणात अस्थी कलशचे चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आले.