नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे. विशेष म्हणजे अजितदादा यांच्या राष्ट्रवादीतून नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार शरद पवार हे निवडून आले. लोहा नगरपरिषदेत एकूण 20 जागांपैकी 17 जागा आणि अध्यक्षपद राष्ट्रवादीने जिंकले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी भाजपाला सोडून हातात राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले होते. राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदासाठी त्यांना उमेदवारी दिली आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.