अजित पवार यांच्या अकाली अपघाती निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यविधीला अनेकांना पोचता न आल्यामुळे अजितदादांचा अस्थिकलश आज साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आणण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि सातारकरांसाठी दर्शनासाठी हा अस्थिकलश ठेवण्यात आला होता. दुपारनंतर या अस्थिकलशातील अस्थीचे विसर्जन संगम माऊली येथील कृष्णा नदी मध्ये करण्यात आले.