बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेची 8 किलोमीटर जीवघेणा प्रवास पाहायला मिळाला. अक्कलकुवा तालुक्यातील केवडी गावातील हा प्रकार आहे. केवडी गावापासून पांढरामाती गावापर्यंत जायला रस्ता नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. सोतीबाई कालूसिंग तडवी वय 30 या असे गर्भवती महिलेचं नाव असून मुख्य रस्त्याला रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने गर्भवती महिलेचे प्राण वाचले.वेळीच उपचारासाठी दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एक ऐरणीवर असल्याचे दिसून आलंय.