अकोल्यात खदान पोलिसांनी गस्तीदरम्यान एका दुचाकीवरील तरुणाकडून ५० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. यश लालवानी नावाचा तरुण कापडी पिशवीत पैसे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गौरक्षण रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील पंचनामा सुरू असून, पैशांच्या स्रोताची चौकशी केली जात आहे.