अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने घाटघर, भंडारदरा आणि रतनवाडी परिसरात भात लागवडीला वेग आलाय...यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने भात लागवडही उशिरा सुरू झाली होती.