अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा पुन्हा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या कापसाचे उत्पादन व दर्जा धोक्यात आला आहे. शेतकरी फवारणीवर खर्च करत असूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीयेत. डिसेंबरची थंडी आणि बोंड अळीच्या दुहेरी हल्ल्याने शेतकरी संकटात आहेत. कृषी विभागाने तातडीने उपाययोजना व मार्गदर्शन करावे, अशी त्यांची मागणी आहे.