अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात युरिया खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आज सकाळी सुमारे पाच वाजल्यापासून दुकाने उघडण्यापूर्वीच, मोठ्या संख्येने शेतकरी खताच्या दुकानांबाहेर रांगा लावून उभे असलेले दिसले.