अकोला जिल्ह्यातल्या बार्शिटाकळी तालूक्यातील कोथळी बुजरूक गावात हनुमान जयंतीनिमित्त जयंतीच्या तीन दिवसांत एक अनोखी पंगत पार पडते. येथे माकडांसाठी जेवणाची बंगत आयोजित केली जाते. माकडांना त्यांना आवडणाऱ्या मिष्टान्नाची पंगत येथे दिली जाते. घनदाट जंगलात असलेल्या मंदिरात गेल्या 20 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.