अकोल्यात तापमानाचा पारा 40.1 अंशांवर गेला आहे. आजपासून उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला असून उष्णतेमुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ करावी लागत आहे. 'ड्रॅगन फ्रुट'ची शेती हिरव्या नेटचा वापर करून झाकावी लागत आहे! अकोला ते बार्शीटाकळी रस्त्यावरील शेतकरी बाळासाहेब रामचवरे या शेतकऱ्याने शेतातील ड्रॅगनची शेती हिरव्या नेटद्वारे झाकली आहे. कारण, सफरचंद आणि ड्रॅगन फ्रुटसारखी शेती थंड हवामान ठिकाणी घेतली जाते. मात्र, थंड ठिकाणी केली जाणारी शेती आता अकोल्यासारख्या उष्ण शहरातही होत आहे. शेती झाकल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि बाष्पीभवन कमी होते आणि पिकांची मुळे थंड राहून उत्पादनात घट होत नाही.त्यामुळे ही काळजी घेतली जात आहे.