अकोला शहरात सध्या थंडीचा तीव्र कडाका जाणवत आहे. किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने नागरिकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पहाटे व रात्री गारठा वाढल्याने नागरिक थंडीपासून बचावासाठी जागोजागी शेकोट्या पेटवून ऊब घेत आहेत. अकोलेकर या कडाक्याच्या थंडीवर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.