अकोला जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने पातूर शहराला चांगलाच तडाखा दिला. अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले होते. तर विशेषतः मुजावरपुरा परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते. तर शहरामध्ये अनेक ठिकाणी नालेसफाई न झाल्यामुळे नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर आले त्यामुळे रस्ते व जलमय झाले होते.