अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव येथील नागरिक गॅस सिलिंडर टंचाईमुळे हैराण झाले आहेत. तर सिलिंडर मिळत नसल्याने आणि सिलिंडरची दुप्पट दराने विक्री होत असल्याने एका युवकाने भन्नाट पर्याय शोधून काढला आहे. तेलाचा टिपा कापून त्यापासून चूल तयार करत त्यावर त्याने स्वयंपाक करायला सुरुवाती केली आहे. विशेष म्हणजे या चुलीवर तो सहज चहा आणि पोहे बनवत असून आता गॅस सिलिंडरची गरजच उरलेली नाही. या जुगाडची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे