अकोला जिल्ह्यातील शिक्षण बचाव कृती समितीने NEET आणि TET पेपरफुटी प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणाची सखोल,पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे.