अकोला जिल्ह्यात नगरपालिका आणि नगर पंचायत मतदानाला सुरुवात झालीये. मात्र, अकोटमध्ये निवडणूक विभाग नगरपालिका प्रशासनाची अक्षम्य चूक समोर आलीये. निवडणूक विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने मतदारांना दिलेल्या 'वोटर स्लिप'मध्ये मतदानाची वेळ चक्क 10 वाजताची लिहिण्यात आलीये. राज्यभरात सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या दरम्यान मतदान होतंय. मात्र, असं असतांनाही निवडणूक विभागाने चक्क 10 वाजताची वेळ लिहित आपली अक्षम्य चूक समोर आलीये.