अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील आलेगावात एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. गावातील एका खासगी विहिरीतील पाणी सलग तीन दिवसांपासून स्पर्शाला उबदार लागत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.