महाराष्ट्रातील CET व MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत अकोला युवक काँग्रेसच्या वतीने आज शहरातील तोष्णीवाल लेआउट परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनातून पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांना न्याय द्या यावेळी दादा भुसे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली असून यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे