काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढताना सर्वोच्च बलिदान देणारे अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील वीरपुत्र आणि 'महार रेजिमेंट'चे जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान करण्यात आले.