पेरणीची लगबग सुरू आहे. पण साधनांची कमतरता कायम आहे. बैल नाहीत, ट्रॅक्टर मिळत नाहीये. अशा कठीण परिस्थितीत अकोले तालुक्यातील जामगाव येथील आदिवासी शेतकरी भागवत उघडे यांनी स्वतःच्या कुटुंबालाच शेतात उतरवलं. मुलगा आणि भाऊ पाभारीला जोडले तर पत्नी आणि भावजयी यांनी कुळव ओढत पेरणी पूर्ण केली.