अक्षय तृतीया निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात आंब्याची आकर्षक आरास मांडण्यात आली असून तुळजाभवानीला आज शिवकालीन अलंकारही घालण्यात आले. शिवकालीन अलंकार पूजा मांडण्यात आल्यानं देवीचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी महाराष्ट्रसह इतर राज्यातील भाविकांनीही तुळजापुरात गर्दी केली आहे.