पिंपरी चिंचवड आणि इंद्रायणी नदीच्या परिसरातील अनेक कंपन्या केमिकल युक्त पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडत असल्याचं वारंवार स्पष्ट होऊनही या कंपन्यांवर कसलीही कारवाई होत नाही. त्यामुळे सातत्याने इंद्रायणी नदीमध्ये फेस निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. आळंदीकर आणि वारकऱ्यांकडून इंद्रायणी नदीत पवित्र स्नान केले जाते. पण गेल्या कित्येक महिन्यापासून इंद्रायणीत प्रदूषण होत आहे. त्यामुळे वारकऱ्यांच आरोग्य धोक्यात आले आहे.