आळंदी येथील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा रासायनिक आणि मैला मिश्रित पाण्यामुळे फेसाळली आहे. या गंभीर प्रदूषणामुळे वारकरी बांधवांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंपन्यांवर कारवाई न करता केवळ तात्पुरत्या उपाययोजना करणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.