रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने घटत असताना ढोकशेत धरणाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. सुमारे २.६३३ दशलक्ष घन मीटर क्षमतेचे ढोकशेत धरण पूर्णपणे आटून तळाला गेले असून सध्या शून्य पाणी साठ्यावर आले आहे. त्यामुळे परिसरातील गावांवर पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील इतर धरणांची स्थितीही फारशी दिलासादायक नाही. घोटवडे आणि उन्हेरे धरणांमध्ये दहा टक्क्यांपेक्षाही कमी साठा शिल्लक आहे, तर कोंडगाव, कवेळे, रानवली आणि पुनाडे या धरणांमध्ये ११ ते ३० टक्क्यांदरम्यान पाणी उपलब्ध आहे.