नंदुरबार जिल्ह्यात नॅशनल ७५२G हायवेच्या कामावर शेतकऱ्यांचा तीव्र आक्षेप घेत आज वाटवी येथे त्यांनी एकत्र येत हायवेचे काम रोखले आहे. जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळत नाही,तोपर्यंत काम सुरू करू देणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. नवापूर तालुक्यातील भादवड ते विसरवाडी दरम्यानच्या जमिनी महामार्गासाठी अधिग्रहित केली, मात्र मोबदला अद्याप कागदावरच आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि NHAI विभागाला शेतकऱ्यांनी आज निवेदन दिले