जळगाव शहरात एकीकडे पाणी साठवण टाक्यांच्या स्वच्छतेची मोहीम राबवली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असताना दुसरीकडे शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी समोर येत आहेत. प्रभाग क्रमांक १८ मधील सुप्रीम कॉलनी परिसरातील नितीन साहित्यानगर येथे दुर्गंधीयुक्त, पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.