श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रामध्ये गॅस तुटवडा होण्याची शक्यता असल्याने मंदिर समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यास, अन्नछत्र बंद पडू नये यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून अन्नछत्रात पारंपारिक पद्धतीने चुलीवर तसेच डिझेल शेगडीच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.