अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रुक्मिणीचा माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथे अंबा रुक्मिणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.. या महोत्सवाची सुरुवात राज्यातील सर्वात मोठ्या बोटिंग स्पर्धेने करण्यात आली.. कौंडण्यपूर ला लागून असलेल्या वर्धा नदी पात्रात झालेल्या या नयनरम्य बोटिंग स्पर्धेचे मनमोहक दृश्य देखील टिपण्यात आले.. फटाक्यांची आताच भाजी टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषाचा माहोल परिसरात संपूर्ण कौंडण्यपूर परिसर दुमदुमून गेला.. यासोबतच सप्तसिंधू जलारपण सोहळ्यात महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला.