अंबादास दानवे यांनी दावा केला आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्री आता शिंदे यांच्या नियंत्रणाखाली राहिलेले नाहीत. त्यांच्यातील अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आपला बॉस मानण्यास सुरुवात केली आहे. दानवे यांच्या मते, शिंदे गटातील नेत्यांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली मांडल्या आहेत, ज्यामुळे शिंदे यांची पक्षावरील पकड कमजोर झाली आहे.