अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षावर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजपला चालतो, पण नवाब मलिक व्यक्तीशः चालत नाहीत, अशी टीका दानवेंनी केली. अप्रत्यक्षपणे मलिकांच्याच पाठिंब्यावर भाजप चालत असल्याचा दावा त्यांनी केला, ही दांभिकता असल्याचा आरोपही त्यांनी केला.