अंबादास दानवे यांनी भाजपच्या उमेदवारी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय जनता पार्टीला स्वतःचे उमेदवार मिळत नसून, त्यांना बाहेरून लोक आणावे लागतात, असा दावा दानवे यांनी केला. मुंबईपासून नांदेड-परभणीपर्यंत भाजपला उमेदवार शोधण्यात अडचणी येत आहेत. संभाजीनगरात युती तुटल्यानंतर भाजपने अनेकांना संपर्क साधल्याचेही त्यांनी नमूद केले.