अंबाजोगाईला युद्धाची झळ आणि अवकाळीचा तडाखा. टरबूज उत्पादक शेतकऱ्यावर दुहेरी संकट. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथील युवा शेतकऱ्याने प्रवीण पितळे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चकाचूर झाला आहे .