अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात दुचाकीस्वारांनी वाळेकर यांच्या अंबरनाथ पश्चिम येथील कार्यालयाजवळ चार राऊंड फायर केले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, दहशत माजवण्याच्या हेतूने हा हल्ला झाल्याचा संशय आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.