अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या खाजगी कार्यालयावर झालेल्या गोळीबार प्रकरणी 'आमच्या पद्धतीने' गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप भाजप करत आहे. जोपर्यंत योग्य गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा भाजपने घेतला आहे, यामुळे तणाव वाढला आहे.