एकेकाळी भीषण दुष्काळामुळे पाण्यासाठी हातात रिकामे कॅन घेऊन रांगा लावणाऱ्या अंबाजोगाई आता एक विदारक आणि वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, अंबाजोगाई तालुक्यासह अनेक ठिकाणी इंधन मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.