अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपने काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे. या युतीमुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात आले आहे. सर्वाधिक नगरसेवक असूनही शिंदे गटाला बाजूला ठेवल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. शिंदे गटाने या युतीला अभद्र युती म्हटले आहे.