पावसाळा तोंडावर असताना अखेर अंबरनाथ शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. शहरात पावसाळ्यात पाणी तुंबू नये यासाठी नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी स्वतः पश्चिम आणि पूर्व भागातील प्रमुख नाल्यांची पाहणी करत कामांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना नालेसफाईची कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.