उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडीया' म्हणणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने निषेध केला. सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारत त्यांची प्रतिमा असलेले बॅनर महिला कार्यकर्त्यांनी पायदळी तुडवले. यावेळी सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.