पुण्याच्या भोर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात आवळा नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्तिक शुक्ल नवमीच्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाचं पूजन करत दिवे लावून गोड नैवेद्य, प्रदक्षिणा आणि मग वृक्षाच्या छायेत अन्नदान करून ही नवमी साजरी करण्यात आली. भगवान विष्णूंचा निवास हा आवळा वृक्षावर असतो, म्हणून ह्या तिथीला सर्व देवी देवता आवळा वृक्षाच्या ठायी येऊन निवास करतात.