अमरावतीच्या बहिरम यात्रेत आमदार प्रवीण तायडे यांनी आमदार हिंद केसरी जंगी शंकरपटाचे आयोजन केले होते. यवतमाळ आणि हिंगोली मधील शेतकऱ्यांच्या बैलजोडीने अवघ्या 6 सेंकदामध्ये हे अंतर गाठले. विजेत्या शेतकऱ्यांना बुलेट गाडी सह लाखोंची बक्षिसे देण्यात आली. या शर्यतीसाठी विदर्भासह राज्यातील मोठ्या संख्येने बैलजोडी सामील झाल्या होत्या.