अमरावतीत विविध भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असून चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील मेघा नदीला पूर आला आहे. बंधारे देखील पाण्याखाली गेले असून नदी दुथडी भरून वाहत आहे.प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.