अमरावती महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 मधील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्या संदर्भात प्रशांत मेश्राम या युवकाने महानगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र दहा दिवसानंतर कोणतेही कारवाई न झाल्याने वडरपुरा येथील रस्त्यावरील खड्ड्यात झोपून या युवकाने आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.