अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी गावात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामे थांबली आहेत. ग्रामस्थ आणि शेतकरी भीतीमुळे शेतात जात नाहीत, त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने रात्री पिंजरा लावला असून, त्यात बकरी ठेवण्यात आली आहे. बिबट्याचा वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.