अमरावती जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस गंभीर रूप धारण करत आहे. मागील 11 महिन्यांत तब्बल 22,661 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला असून, यात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद आहे. दररोज सरासरी 68 लोकांना कुत्र्यांच्या चाव्याला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, ही आकडेवारी शहर आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये वाढता धोका दर्शवते.